Chakan : गतिमंद मुलाने केला वडिलांचा खून

एमपीसी न्यूज – गतिमंद मुलाने वडिलांसोबत (Chakan) भांडण करून वडिलांच्या डोक्यात अवजड वस्तूने मारून त्यांचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 30) सकाळी खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथे घडली.

खंडू लांडे (रा. दौंडकरवाडी, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी खंडू यांचा मोठा मुलगा बाबाजी खंडू लांडे (वय 35) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खंडू यांचा लहान मुलगा नितीन खंडू लांडे (वय 32) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन लांडे याने वडील खंडू यांच्याशी घरातील किरकोळ कारणावरून वाद घालत भांडण केले. त्यातून वडिलांच्या डोक्यात अवजड वस्तूने मारून त्यांना गंभीर जखमी केले. हा प्रकार फिर्यादी यांच्या चुलत भावाने पाहिला आणि त्याबाबत फिर्यादी यांना फोनवरून माहिती दिली. फिर्यादी कामानिमित्त बाहेर असताना हा प्रकार घडला. (Chakan) दरम्यान, खंडू यांना चाकण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Pune : पुणे येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेसिडेंट्स कलर सन्मान प्रदान

तिथून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. त्यानुसार त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास खंडू यांचा मृत्यू झाला. आरोपी मुलगा नितीन हा मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.