Baramati Accident : वाढदिवसच ठरला चिमुकल्याचा आयुष्यातला शेवटचा दिवस, दुर्घटनेत तीन वर्षे मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : एका तीन वर्षीय मुलाचा (Baramati Accident) वाढदिवसाचा दिवसच त्याच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला. एका विचित्र अपघातात या तीन वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अर्हत थोरात असे मृत्यू झालेल्या या चिमुरड्याचे नाव आहे. बारामतीतील हॉटेल शिवमसमोर ही दुर्दैवी घटना घडली. 

 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, 9 ऑक्टोबर रोजी अर्हत याचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा झाल्यानंतर तो रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आईसोबत बारामतीत आयोजित एक मेळावा पाहण्यासाठी निघाला होता. आईसह तो जात असताना दुर्दैवी अपघात झाला. रस्त्यात असलेला लोखंडी अँगल ओलांडून ते पुढे निघाले होते, त्याचवेळी भरधाव वेगात आलेली एक दुचाकी अँगलला येऊन धडकली.

 

Chakan Murder Case : कोयत्याने सपासप वार करुन तरुणाचा खून

 

त्यानंतर हा लोखंडी अँगल अर्हतच्या डोक्याला (Baramati Accident) लागला. मोठ्या प्रमाणात जखम झाल्याने रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, काही रुग्णालयांनी अपघाताचे रुग्ण घेत नसल्याचे सांगितले. शेवटी एका रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास उशीर झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.