Pune Murder Case : पूर्ववैमनस्यातून महिलेचा गळा चिरून खून, पुणे जिल्हा हादरला

एमपीसी न्यूज : पूर्ववैमनस्यातून एका महिलेचा (Pune Murder Case) गळा चिरून खून करण्यात आला. इंदापूर तालुक्यातील लाकडी या ठिकाणी ही घटना घडली. रूपाली शेखर काटे असे खून झालेल्या महिलेची नाव आहे. आरोपी राजेंद्र रामचंद्र जराड याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर, ललेंद्र मारुती शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत कृपाली काटे या फिर्यादी यांची सावत्र बहिण आहे. सोमवारी सकाळी त्या प्रात्यविधीसाठी गेल्या होत्या. त्याच ठिकाणी आरोपी दबा धरून बसला होता. रूपाली यांना पाहताच त्याने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. अतिशय निर्दयपणे त्यांचा गळा चिरला आणि त्यानंतर तिथून पळून गेला. फिर्यादीच्या नातेवाईकांना हा प्रकार समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता रूपाली यांचा मृत्यू झाला होता.
(Pune Murder Case) पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी इंदापूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.