Chakan murder : चाकण येथे मृतदेह घेऊन नातेवाईक पोहचले पोलीस ठाण्यात, हत्येतील आरोपींना अटक करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून झाला. यातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करा अशी मागणी करत खून झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृतदेह थेट पोलीस ठाण्याच्या समोर आणून ठिय्या आंदोलन केले. (Chakan murder) चाकण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतले असून हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन नातेवाईकांना दिले. त्यानंतर शांत झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेल्याचा प्रकार मंगळवारी चाकण पोलीस ठाण्याच्या समोर घडला.

जुन्या वादातून युसुफ अर्षद काकर ( वय 19 , रा. खंडोबा माळ,चाकण ) या तरुणाची हत्या सोमवारी (दि.10) करण्यात आली. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात  प्रणव ऊर्फ पन्या संजय शिंदे या प्रमुख आरोपीसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यातील सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येच्या घटनेनंतर काकर कुटुंबीय आणि नातेवाईक संतप्त झाले होते. त्याच रागातून युसुफ याचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यापूर्वी चाकण पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर आणण्यात आला.

Sanjay Gandhi Destitute Grant Scheme: जिल्ह्यात सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ३५ कोटींचे वितरण

संतप्त नातेवाईकांनी आक्रमकपणे आरोपींना अटक करण्याची मागणी केली. पोलीस ठाण्याच्या समोर मृतदेह आणून ठेवल्याने अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांनी 9 पैकी 7 आरोपी रात्रीच ताब्यात घेतले असून आणखी काही जणांचा शोध सुरु असल्याचे नातेवाईकांना सांगितले. (Chakan murder) आक्रमक नातेवाईकांना शांत करून खून प्रकरणात प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर काही वेळाने नातेवाईकांनी युसुफ याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला.

दरम्यान पूर्व वैमनस्यातून मागील वर्षी रोहित सहानी या तरुणाचा चाकण मार्केट यार्ड समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोकळ्या निर्जन जागेत खून झाला होता.(Chakan murder)त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अत्यंत नियोजनपूर्वक हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रिक्षा चालक म्हणून काम करत असलेल्या युसुफला दोघांनी प्रवाशी बनून रोहकल रस्त्यावरील निर्जन ठिकाणी नेले; त्यानंतर नऊ जणांनी हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.