Pimple Nilakh protest : खुल्या जागेवर दारू पिणाऱ्यांना दिले दूध; माजी नगरसेवक तुषार कामठे यांची गांधीगिरी

 एमपीसी न्यूज – पिंपळेनिलख विशालनगर येथील वाईन शॉप शेजारील खुल्या जागेत मद्यप्राशन करणाऱ्यांना दूध वाटप केले. माजी नगरसेवक तुषार कामठे (Pimple Nilakh protest) यांनी आज (बुधवारी) गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. यापुढे मद्यप्राशन करण्यास बसल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला.

पिंपळेनिलख विशालनगर  डीपी रोड येथे वाइन शॉप आहे. या वाइन शॉप मधून मद्य खरेदी केले जाते. शॉपच्या बाजूला खुली जागा आहे. या खुल्या जागेत लोक मद्यप्राशन करण्यासाठी बसतात. त्यांचा प्रभागातील नागरिकांना त्रास होत आहे. ये-जा करणाऱ्या मुली, विद्यार्थिनी, महिलांना त्रास होत आहे.(Pimple Nilakh protest) महिलांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरसेवक तुषार कामठे यांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. मद्यप्राशनास बसलेल्याना दूध देण्यात आले. सर्वांना दुधाचे वाटप केले. मद्यप्राशन करणाऱ्यांना समजावून सांगण्यात आले.

Chakan murder : चाकण येथे मृतदेह घेऊन नातेवाईक पोहचले पोलीस ठाण्यात, हत्येतील आरोपींना अटक करण्याची मागणी

माजी नगरसेवक तुषार कामठे म्हणाले, दररोज खुल्या जागेत लोक मद्यप्राशन करण्यासाठी बसतात. त्याचा ये-जा करणाऱ्या महिलांना त्रास होत आहे. (Pimple Nilakh protest) त्यामुळे मद्यप्राशन करणाऱ्यांना पिण्यासाठी दूध दिले. समजावून सांगितले. यापुढे दूध पिण्यास बसल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.