Pimpri : कलम ३७० आणि ३५ (अ) हटविल्याबद्दल पिंपरी युवासेना विधानसभेकडून जल्लोष

एमपीसी न्यूज – सरसेनापती हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी पाहिलेले स्वप्न साकारत जम्मू – काश्मीर बाबतचे ३७० आणि ३५(अ) कलम हटविण्याच्या निर्णय घेत जम्मू – काश्मीर भारतात सामील करण्याच्या प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन जिल्हासंघटिका सुलभा उबाळे, युवासेना पिंपरी विधानसभा व शिवसेनेच्या नगरसेविका मीनल विशाल यादव यांच्या वतीने पेढे भरवून जल्लोष करुन साजरा करण्यात आला.

यावेळी विभागप्रमुख विशाल यादव, युवती सेनाधिकारी पिंपरी विधानसभा प्रतीक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके शशीकला उभे, वैभवी घोडके, कामिनी मिश्रा, कल्पना जाधव, मंदा  फड,  दीपाली गावडे, प्रांजल पाडेकर, विकास गायकवाड, व शिवसेना महिला आघाडी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.