Pimpri : पूरग्रस्त गरजू नागरिकांना त्वरित आर्थिक मदत मिळावी

युवासेना पिंपरी विधानसभेची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात जलवृष्टी झाल्यामुळे पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या घरांमध्ये, वस्त्यांमध्ये पाणी शिरुन लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच कपडे, अन्नधान्य व आर्थिक नुकसान झाले आहे.  याची दखल घेऊन पूरबाधितांच्या घराची पाहणी व नोंदणी करुन शासनामार्फत त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी युवासेना पिंपरी विधानसभेने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

यावेळी युवतीसेना अधिकारी प्रतीक्षा घुले, विभागसंघटक निलेश हाके, गोपाळ मोरे, ओंकार जगदाळे, अजित बोराडे, रवी नगरकर उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या पुरात हजारो नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहे. अशा पूरग्रस्त नागरिकांना त्वरीत शासनाने मदतीचा हात द्यावा. धऱण क्षेत्रात मागील आठवडाभरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

त्यामुळे अनेक लोकांच्या घरांमध्ये, वस्त्यांमध्ये पाणी शिरुन लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो संसार रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे याची दखल घेऊन लोकांच्या घराची पाहणी व नोंदणी करुन शासनामार्फत त्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.