Vadgaon Maval : व्यवसाय यशस्वी करण्यासाठी नियोजन पद्धतीचे कठोर परिश्रम महत्वाचे -माउली दाभाडे

एमपीसी न्यूज –  पोल्ट्री उद्योजकांनी आपला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी निष्ठा आणि कठोर परिश्रम करावेत. नियोजित पद्धतीने कठोर परिश्रम केल्यास आपला व्यवसाय (Vadgaon Maval)  यशस्वी होतो, असे मार्गदर्शन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी पोल्ट्री व्यावसायिकांना केले.

 

 

वडगाव मावळ येथे पोल्ट्री उद्योजकांच्या सभेत दाभाडे हे बोलत होते. यावेळी  पोल्ट्री उद्योजक गजानन खरमारे,सुभाष केदारी, संभाजी केदारी, प्रविण शिंदे, सोमनाथ राक्षे, विनायक बंधाले, गणेश वरघडे, रमेश जाचक आणि गणपत  भानुसघरे आदी उपस्थित होते.

 

Crime News : हिंजवडी येथे बसच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

 

मावळ तालुक्यात पोल्ट्री व्यवसाय गेली  वीस वर्षे चालू आहे. या व्यवसायात हजारो (Vadgaon Maval) तरूण  कार्यरत असुन काहीनी चांगली प्रगती केली आहे. असे सांगुन दाभाडे  म्हणाले की आपला व्यवसाय अधिक यशस्वी  करण्यासाठी नियोजन पद्धतीने कठोर परिश्रम केले पाहिजेत.

 

 

आगामी काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक पोल्ट्री व्यवसायिकाना पक्षी घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे तसेच खाद्य व औषधे घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहेत.या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन श्री दाभाडे यांनी केले. या सभेचे नियोजन  पोल्ट्री संघटक गोपाळेगुरूजी यांनी केले होते.

 

 

या महिना अखेरीस  मावळ तालुक्यातील पोल्ट्री फार्मरची विशेष सभा घेऊन प्रत्यक्ष काही फार्मरला कर्ज वाटप करणार आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.