Pimpri News : माजी नगरसेवक रामशेठ लालवाणी यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक रामशेठ लालवाणी (Pimpri News) यांचे शनिवारी (दि. 23)  अल्पशा आजाराने  निधन झाले.

 

ते १९९२ ते १९९७ या कालावधीत महापालिकेत नगरसेवक होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची शोकसभा पिंपरी कॅम्पमधील बी. टी अडवाणी धर्मशाळा येथे सोमवारी (दि.25) दुपारी 12.30 वाजता आयोजित केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.