Crime News : अकरा वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – अकरा वर्षाच्या मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या नराधमास (Crime News)  हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.22) रात्री पावणेनऊच्या सुमारास मुळशी येथे घडली.

 

 

पारस जेपाराम देवासी (वय 29 रा.मुळशी) असे अटक आरोपीचे नाव असून हिंजवडी पोलीस ठाण्यात पिडीतेच्या आईने फिर्याद दिली आहे.

Crime News : हिंजवडी येथे बसच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 वर्षाच्या मुलीला शिवीगाळ करत गैरवर्तन केले. यावेळी फिर्यादी यांनाही आरोपीने माराहाण व शिवीगाळ केली आहे. यावरून हिंजवडी पोलिसांनी आरोपीवर (Crime News)  बाललैंगीक अत्याचार व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.याचा पुढिल तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.