Talegaon Dabhade : ॲड शलाका खांडगे यांच्या शोकसभेला तळेगावात मान्यवरांची उपस्थिती

एमपीसी न्यूज – तळेगाव पंचक्रोशीतील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील धुरीण म्हणून ओळखले जाणारे डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष दत्तात्रय खांडगे यांची कन्या आणि युवा विधिज्ञा ॲड. शलाका संतोष खांडगे यांचे शुक्रवार (दि. ८) अकस्मिक निधन झाले. या अकस्मिक निधनामुळे तळेगाव दाभाडे शहरातील खांडगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शलाका यांच्या पश्चात खांडगे कुटुंबीयांना आधार देणाऱ्या विविध संस्थांच्या वतीने शनिवारी (दि. 23) शोकसभा आयोजित करण्यात आली. 

 

 

याप्रसंगी विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, आप्त स्वकीय, नातेवाईक, पुणे बार असोशिएशन आणि मित्रमंडळीसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, समाज प्रेमी आपा प्रतिष्ठान, मावळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, रोटरी क्लब ऑफ मावळ, मैत्रेय ग्रुप रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन, इंद्रायणी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना, मावळ तालुका इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनच्या वतीने या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

खांडगे कुटुंबाचा समृद्ध शैक्षणिक, सामाजिक वारसा जपत एक उत्कृष्ठ विधिज्ञ म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या ॲड.शलाका संतोष खांडगे यांच्या आकस्मिक जाण्याने सर्व आप्त स्वकीय आणि मावळवासीयांना हुरहूर लागली होती. कै.शलाका खांडगे यांच्या आठवणींचा जागर म्हणून आज श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकमय वातावरणात अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत कै. शलाका यांच्याबद्दलच्या अमीट आणि गोड आठवणींना उजाळा दिला. संस्कार, विविधांगी गुण आणि अफाट बुद्धिमत्ता या त्रिगुणात्मक संगमामुळे शलाका यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक अनेकांना होते.

 

 

Vadgaon Maval : व्यवसाय यशस्वी करण्यासाठी नियोजन पद्धतीचे कठोर परिश्रम महत्वाचे -माउली दाभाडे

 

 

यावेळी विविध संस्थाचे प्रतिनिधी व पदाधिकारी शंकर हादिमणी, कुसुम वाळुंज, चंद्रभान खळदे, डाॅ शाळीग्राम भंडारी,अनंत परांजपे, गिरीश तात्या खेर,सोनबा गोपाळे गुरूजी, मंगेश गारोळे, गणेश काकडे,दिनेश भोसले,सुरेश धोत्रे दत्तात्रय सावंत,ॲड श्रीराम कुबेर,ॲड राजेंद्र दौंडकर,बाळासाहेब अरगडे,विलास भेगडे, राजू खांडभोर,सुनंदा काळे,राजेंद्र नवले, मनोहर दाभाडे,राहुल पारगे आदींनी आपल्या शब्द सुमनांनी शोकसभेत श्रद्धांजली वाहिली.

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ जांभुळकर यांनी केले तर दीपक फल्ले यांनी प्रास्ताविक केले. श्रीक्षेत्र देहू येथील खांडगे परिवाराचे स्नेही बाळासाहेब काळोखे यांनी उपस्थित सर्वांच्यावतीने अखेरची श्रद्धांजली समर्पित करून सर्वांचे ऋणनिर्देश देऊन पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.