Pimpri News : गोपीचंद कवडे यांचे निधन

एमपीसी न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रथम आरोग्य समितीचे सभापती व तानाजीनगर भागाचे भाजपाचे माजी नगरसेवक गोपीचंद खंडुजी कवडे ( वय ७४ ) यांचे रविवारी चिंचवडमधील खाजगी हॅास्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन विवाहित मुली, जावई नातवंडे हा परिवार आहे.

चिंचवड येथील तालेरा हॅास्पिटल व पिंपरीमधील जिजामाता हॅस्पिटल तसेच आकुर्डी व भोसरी या भागातील आरोग्य सुविधा नागरिकांना मिळण्यासाठी दवाखान्याची पायाभरणी कवडे यांच्या कारकिर्दीत झाली. ते स्थायी समिती सदस्य होते.
1986 साली त्यांचा 11 मतांनी माजी उपमहपौर विष्णुपंत कांबळे यांच्याकडून पराभव झाला. कवडे हे S K F कंपनीत अधिकारी होते.
नंतर त्यांनी स्वत:चा उद्योग सुरु केला होता. मुळचे नगरमधील असलेले कवडे हे उच्चशिक्षित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.