पावसामुळे फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

एमपीसी न्यूज : गेल्या आठवड्यात सतत पडत असलेल्या पावसाचा फुलांना फटका बसला आहे. फुलांचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे भावातही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. चांगल्या मालाचा बाजारात तुटवडा असून त्यास चांगले भाव मिळत आहे. आवारात आवक होणाऱ्या मालापैकी तब्बल ७० ते ८० टक्के फुलांची प्रत खालावली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२०, गुलछडी : २०-४०,अष्टर : जुडी : १०-२०, सुट्टा: ८०-१००, बिजली : १०-४०, कापरी : १०-२०, शेवंती : २०-५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : २०-४०, डच गुलाब (२० नग) : ४०-८०, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ६०-१२०़ शेवंती काडी: १००-१५०, आॅर्चिड : ३००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) ५०-८०, जुई ४००-५००़

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.