Hinjawadi : गुंतवलेल्या रकमेवर 30 टक्के परतावा देतो म्हणत 49 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – गुंतवलेल्या रकमेवर 30 टक्के परतावा (Hinjawadi) देतो असे आमिष दाखवून आयटी अभियंत्याची 49 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजवडी येथे उघडकीस आला आहे. ही घटना 28 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत घडली असून दोन महिन्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहासिंग हृदयनारायण सिंग (वय 35, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अधुरी गांगुली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना व्हाट्सअपवर लिंक पाठवली. आरोपीकडे पार्ट टाइम जॉब असून सुरुवातीला युट्युबवरील व्हिडीओ लाईक करण्यास सांगितले. त्या टास्कचे आरोपीने फिर्यादी यांना 150 आणि 350 रुपये दिले.

फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे मोठ्या रकमेचे टास्क असून तीन टास्क पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यात 30 टक्के नफ्यासह गुंतवलेली रक्कम पाठवली जाईल, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी तीन टास्कमध्ये एकूण 49 लाख रुपये गुंतवले. मात्र त्यानंतर आरोपीने फिर्यादीला कोणताही नफा अथवा त्यांनी (Hinjawadi) गुंतवलेली रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Pune : लष्करातील नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची 28 लाखांची फसवणूक; आत्तापर्यंत 100 जणांना घातला गंडा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.