Pune : लष्करातील नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची 28 लाखांची फसवणूक; आत्तापर्यंत 100 जणांना घातला गंडा

एमपीसी न्यूज – भारतीय सैन्य दलात सामील (Pune) होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, तिथपर्यंत पोहचणे हे वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे अनेकजण सोप्या पद्धतीने  कसे पोहचता येईल? असा प्रयत्न करतात व यातूनच ते अनेकवेळा फसवणूकीला बळी पडतात. अशाच एका घटनेत स्पेशल इनपुट मिलिटरी इंटेलिजन्स दक्षिण विभाग पुणे आणि पुणे पोलिस यांनी संयुक्तरित्या कारवाई करत एका भामट्यावर गुन्हा दाखल केला आहे. ज्याने आत्तापर्यंत 10 जणांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे.

प्रमोद यादव असे आरोपीचे नाव असून तो मूळचा नाशिकचा आहे. त्याच्या विरोधात राहुल बच्छाव यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हे भारतीय लष्करात भरतीसाठी प्रयत्न करत होते. यावेळी त्यांची ओळख प्रमोदसोबत झाली. तेव्हा प्रमोदने त्यांना वारंवार परीक्षेसाठी पैश्याची मागणी केली, तसेच परीक्षा देण्यासाठी तुम्हाला यायला लागेल. त्याची तयारी करावी लागेल असे खोटे मार्गदर्शन केले.

इतकचं नव्हे तर आरोपी प्रमोदने राहुलचा विश्वास संपादन करण्यासाठी भारतीय लष्कराच्या युनिफॉर्म घातलेले 7 ते 8 डमी अधिकारी उभे केले. वारंवार पैसे देऊनसुद्धा पुढे काही होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राहुलने पोलिसात तक्रार दिली आहे. भारतीय लष्करात नोकरी लावून देतो, या प्रकरणात 100 हून अधिक तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

याविषयी (Pune) भारतीय लष्कर प्रसासन व पोलिसांनी तरुणांना अशा भूलथापांना बळी न पडता भरतीसाठी शारीरिक मेहनत व अभ्यास हा एकच मार्ग आहे. तसेच कोणी असे आमिष दाखवत असल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील केले आहे.

Pimpri : सोशल मीडियावरील बनावट खात्यावरून साडेसहा लाखांची फसवणूक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.