Pimpri : सोशल मीडियावरील बनावट खात्यावरून साडेसहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – टेलिग्राम या सोशल मीडियावर (Pimpri) बनावट खाते बनवून त्यावरून एका व्यक्तीला खोटी ओळख सांगत व्यक्तीची साडेसहा लाखांची फसवणूक केली. ही घटना 9 ते 24 जानेवारी या कालावधीत संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

वासिम नुरमोहम्मद तांबोळी (वय 35, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 919419358856 क्रमांक धारक अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादीला व्हाट्सअपवरून संपर्क केला. ती महिला ग्लोबल चॅट प्लॅटफॉर्म सिंगापूर या कंपनीची एच आर मॅनेजर असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर बनावट टेलिग्राम खाते बनवून त्यावरून खोटी ओळख दर्शवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

त्यातून फिर्यादीची सहा लाख 65 हजार 650 रुपयांची फसवणूक (Pimpri) केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Pune News : चैतन्य ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.