Pune News : चैतन्य ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – पुणे येथील चैतन्य ग्रुपतर्फे 15 ते 20 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी (Pune News) गणेश कला क्रीडा मंच येथे शनिवार दिनांक 24 जून रोजी पुणे येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तींशी संवाद साधण्याची सुवर्ण संधी व आयुष्यभर पुरेल अशी प्रेरणा आणि स्फूर्ती विद्यार्थ्यांना या शिबिरातून मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. याशिवाय बी. व्ही. जी. इंडियाचे हणमंतराव गायकवाड, एम. के. सी .एल.चे विवेक सावंत, पद्मश्री पोपटराव पवार, जेष्ठ करीअर मार्गदर्शक विवेक वेलणकर हे मान्यवर देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

चैतन्य ग्रुप पुणे ही कोणतीही राजकीय संस्था नाही, तर विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित समविचारी लोकांचा एक ग्रुप आहे. यात अनेक अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, व्यवसायिक आहेत.

या सर्वांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांकरिता कार्यक्रम करण्याचे नियोजन केलेले आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवार दिनांक 24 जून रोजी एकदिवसीय मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर यांची करिअर आणि जीवन प्रवास या विषयावर प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे.

एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत हसत-खेळत करिअर मार्गदर्शन करणार आहेत. तर बीव्हीजी limited कंपनीचे सर्वेसर्वा हणमंतराव गायकवाड स्वतःच्या यशाचे गमक सांगणार आहेत. पद्मश्री पोपटराव पवार हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे, तर करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर दहावी आणि बारावी नंतरचा करिअर निवडण्याचा मार्ग दाखवणार आहे.

अशी शैक्षणिक पर्वणी असणारा दिवसभराचा कार्यक्रम विद्यार्थी आणि पालक यांनी चुकवू नये असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे. हा कार्यक्रम 24 जून  रोजी सकाळी वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत श्री गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहनसुद्धा आयोजकांनी केले (Pune News) आहे.

MPC News Special : पोलीस आयुक्तालयाचा संपूर्ण कारभार चालणार ‘ऑनलाईन’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.