-MPC-TOP-MOST-BANNER-I

Hinjawadi Crime : उच्चशिक्षित असल्याचे सांगून जबरदस्तीने लग्न करणाऱ्या तरुणावर गुन्हा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – आपण उच्च शिक्षित असल्याचे खोटे सांगून तरुणीशी जबरदस्तीने लग्न करणाऱ्या तरुणावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हिंजवडी येथे घडली.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

राहुल मंगलदास हसाळकर (रा. माहेगाव देशमुख, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 24 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि. 11) हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दिली आहे. ही घटना ऑगस्ट 2018 ते मार्च 2020 या कालावधीत हिंजवडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल याने फिर्यादी तरुणीस आपण उच्चशिक्षित असल्याचे भासविले. त्यानंतर तिच्याशी ओळख वाढवून तिच्यासोबत फोटोही काढले. फिर्यादीस धमकी देऊन तिचे वडिल आणि भाऊ यांना उडवून देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच बळजबरीने लग्न करून त्याचे फोटो काढले. फिर्यादी तरुणीचा विरोध असताना लग्नाचे कागदपत्र वाचून न देता त्यावर घाईघाईने स्वाक्षरी घेतली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.