Bavdhan : गावठी दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या ( Bavdhan ) महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) बावधन येथे करण्यात आली.

 

पोलीस अंमलदार रवी पवार यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते प्राजच्या शाश्वत विमान इंधन प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू विक्रीसाठी जवळ बाळगली. याबाबत माहिती मिळाली असता हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई मध्ये 28 हजार 350 रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिसांची चाहूल लागताच महिला पळून गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत ( Bavdhan ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.