-MPC-TOP-MOST-BANNER-I

Hinjawadi Crime : शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणारी टोळी हिंजवडी पोलिसांच्या जाळ्यात

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – शस्त्राचा धाक दाखवून एका कार चालकाला लुटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार 28 सप्टेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता हिंजवडी परिसरात घडला. त्या गुन्ह्याचा तपास करून हिंजवडी पोलिसांनी एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक पिस्टल सारखे दिसणारे लायटर जप्त करण्यात आले आहे.

अनिकेत मधुकर बोराडे (वय 19, रा. वराळे, तळेगाव दाभाडे), रॉकी उर्फ अनिल जयंत जाधव (वय 20, रा. तळेगाव दाभाडे), विशाल मंजीनाथ वर्मा (वय 19, रा. काळोखेवाडी, तळेगाव दाभाडे), शरद ज्ञानेश्वर मोरे (वय 22, रा. रीहे, मोरेवाडी, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

योगेश गणेश शिंदे (वय 34, रा. कोंढवा खुर्द, पुणे) हे त्यांच्या पत्नीची वाट पाहत हिंजवडी येथील टीसीएस कंपनीसमोर त्यांच्या कारमध्ये बसले होते. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना पिस्तुल आणि कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. याबाबत शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

या प्रकरणाचा तपास करत असताना हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली की, लुटण्याचा प्रयत्न करणारे हे आरोपी तळेगाव दाभाडे परिसरातील आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक पिस्टल सारखे दिसणारे लायटर असा एकूण एक लाख 15 हजार 525 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

आरोपी शरद मोरे यांच्यावर एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर रॉकी जाधव याच्यावर दरोड्याचा एक गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, सहाय्यक निरीक्षक सागर काटे, सहाय्यक फौजदार वायबसे, पोलीस कर्मचारी बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, आतिक शेख, हनुमंत कुंभार, सुभाष गुरव, अमर राणे, कारभारी पालवे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, झनक गुमलाडू, विवेक गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.