Hinjawadi Crime : कामावरून काढून टाकले म्हणून धमकी; खंडणी ते थेट कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – कामावरून काढून टाकले (Hinjawadi Crime) म्हणून माथेफिरूने त्याच्या साथीदारांसाह मिळून मालकाच्याच घरातील महिलांचे अश्लिल फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली, त्यासाठी खंडणी घेतली. पुढे वाढीव खंडणी देण्यास मालकाने नकार दिला असता थेट कोयत्याने हल्ला केला आहे. हा प्रकार 2 डिसेंबर ते आजपर्यंत हिंजवडी व भोसरी परिसरात घडला.

याप्रकरणी मालकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अशोक सांगळे, रुद्र चाटे व त्यांचे इतर पाच साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ravet News : पदपथ व सायकल ट्रॅक विकसित करणार; 13 कोटींचा खर्च

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक याला फिर्यादी यांनी कामावरून काढून टाकले. याचाच राग मनात धरून त्याने फिर्यादीला घरातील महिलांचे अश्लिल फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसे न करण्यासाठी त्याने फिर्यादीकडे पाच लाखांची लाच मागितली, ती त्यांनी आरोपीला दिली. मात्र, यावरच आरोपीचे समाधान झाले नाही. त्याने पुन्हा फिर्यादीकडे 25 लाख रुपायांची खंडणी मागितली. यावेळी फिर्यादी यांनी नकार दिला, याचाच राग मनात धरून त्याने फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली व इतर साथीदारांसह मिळून भोसरी येथील पीएमटी ऑफीस समोर फिर्यादीवर कोयत्याने हल्ला केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.