Ravet News : पदपथ व सायकल ट्रॅक विकसित करणार; 13 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – रावेत येथील (Ravet News) संत तुकाराम महाराज पूल ते मुकाई चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कडेला पदपथ व सायकल ट्रॅक करण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या 13 कोटी 9 लाख रुपयांसह विविध विकास विषयक कामांच्या सुमारे 46 कोटी 11 लाख रुपयांच्या खर्चाच्या विषयाला प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.

महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विकास विषयक कामांच्या सुमारे 46 कोटी 11 लाख रुपये खर्चाच्या मंजुरीचे विषय आज प्रशासक सिंह यांच्या समोर मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांना त्यांनी मंजुरी दिली. रावेत येथील संत तुकाराम महाराज पूल ते मुकाई चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कडेला पदपथ व सायकल ट्रॅक करण्यात येणार आहेत. याकामी 13 कोटी 9 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच पिंपळेसौदागर येथे गिर्यारोहणासाठी क्लायबिंग वॉल बांधण्यासाठी येणा-या 4 कोटी 43 लाख रुपये खर्चाच्या विषयास मंजुरी देण्यात आली.

Warje : वारजेमध्ये सहा दुचाकींना लागली आग

बीआरटी कॉरीडॉर 4 वरील बस स्टॉप पेंटिंग, कॉरीडॉर दुरुस्ती,फुटपाथ दुरुस्ती तसेच (Ravet News) इतर स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहे. याकामी 1 कोटी 7 लाख रुपये खर्च होणार आहेत. बीआरटी कॉरीडॉर 4 वरील खोदलेल्या चरांची दुरुस्ती करणे तसेच इतर अनुषंगिक स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या 1 कोटी 6 लाख रुपये खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.