Warje : वारजेमध्ये सहा दुचाकींना लागली आग

एमपीसी न्यूज : वारजे येथे मंगळवारी (10 जानेवारी) रोजी दुपारी वारजे (Warje) पोलिस चौकी लगत असलेल्या दुचाकी वाहनांना आग लागल्याची घटना घडली. आगीची वर्दी मिळताच वारजे अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

Talegaon Dabhade : तळेगावात भरदिवसा घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून पावणे अकरा लाखांचा ऐवज चोरला

मोकळ्या मैदानात या सहा दुचाकी होत्या. त्यावर पाण्याचा मारा करुन आग त्वरित विझवण्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली? हे समजू शकले नाही. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली (Warje) नाही. सदर कामगिरीत वाहनचालक गौरव बाठे, तसेच जवान राजेंद्र पायगुडे, जयेश लबडे, निलेश तागुंदे, अतुल नागवडे, गोविंद केंद्रे यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.