Hinjawadi : गोडाऊनमधून सव्वातेरा लाखांची कॉपर इलेक्ट्रिक वायर चोरीला

एमपीसी न्यूज – गोडाऊन मध्ये ठेवलेली 13 लाख 37 हजार 37 रुपये किमतीची कॉपर इलेक्ट्रिक वायर चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 25 जून रोजी हिंजवडी येथे रात्री उघडकीस आली.

सुमित विन्नी रामचंद्र फेरवानी (वय 38, रा. आयटीआय रस्ता, औंध) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित यांचा केबल वायरचा व्यवसाय आहे. त्यांचे हिंजवडी फेज एक येथे टाटा टेक्नॉलॉजीसच्या मागच्या बाजूला ‘श्रीकृष्ण केबल्स सन्स’ हे गोडाऊन आहे. गोडाऊनमध्ये कॉपर इलेक्ट्रिक वायर ठेवलेल्या आहेत. 25 जून रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोडाऊनचा पत्रा उचकटून गोडाऊनमध्ये प्रवेश केला. गोडाऊनच्या भिंतीला मोठे छिद्र पाडून त्याद्वारे 13 लाख 37 हजार 37 रुपये किमतीचे कॉपर इलेक्ट्रिक वायरचे 408 बंडल चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.