Hinjawadi : अनुभव प्रमाणपत्र देण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – अनुभव प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रकाश कित्ते (वय 32, रा.जत, सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला अनुभव प्रमाणपत्र मिळवून देण्याचे अमिश दाखवले. त्या माध्यमातून त्याने महिलेशी सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ‘तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’ असे म्हणत तसेच अनुभव प्रमाणपत्र देण्यासाठी येरवडा येथे बोलावून बळजबरीने सेल्फी काढला. महिलेची इच्छा नसतानाही आरोपीने गिफ्ट देऊन लग्नासाठी तगादा लावला. ही वागणूक महिलेला सहन न झाल्याने तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.