Hinjawadi : घेतलेले पैसे परत मागितले असता महिलेला बदनामी करण्याची धमकी

एमपीसी न्यूज – महिलेकडून वेळोवेळी दोन लाख 40 हजार रुपये (Hinjawadi)घेतले. महिलेने ते पैसे परत मागितले असता महिलेची सोशल मीडियावर बदनामी करण्याची तरुणाने धमकी दिली. हा प्रकार 28 जानेवारी ते 18 मे या कालावधीत घडला.

 याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आफताब युनिस अन्सारी (वय 24, रा. नवी दिल्ली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangavi : स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओळखीचा मुलगा आरोपी याने फिर्यादी यांच्याकडून वारंवार पैसे मागत दोन लाख 40 हजार रुपये घेतले. फिर्यादी यांनी ते पैसे परत मागितले असता (Hinjawadi) आरोपीने फिर्यादींना हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत त्यांची बदनामी करण्याची आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.