Sangavi : स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर (Sangavi) अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 18) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कृष्णा नगर, नवी सांगवी येथे करण्यात आली.

कुणाल राममूर्ती रेड्डी (वय 39, रा. बोपोडी पुणे) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक मारुती करचूंडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Vadgaon Maval : सिद्धेश ढोरे यांच्या वतीने गरजू कुटुंबाला उद्योग व्यवसायासाठी हातगाडी भेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत (Sangavi) करून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला. आरोपींनी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये स्पा मालक कुणाल रेड्डी आणि एक महिला या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.