Vadgaon Maval : सिद्धेश ढोरे यांच्या वतीने गरजू कुटुंबाला उद्योग व्यवसायासाठी हातगाडी भेट

एमपीसी न्यूज – मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक (Vadgaon Maval) बांधिलकी जपत सिद्धेश ढोरे यांच्या वतीने वडगाव शहरातील एका गरजू कुटुंबाला उद्योग व्यवसायासाठी हातगाडी भेट देण्यात आली. सिद्धेश राजाराम ढोरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविला. व्यवसायासाठी हातभार लागल्याने लाभार्थी थोरात कुटुंबीयांनी ढोरे यांचे आभार मानले.

वडगाव नगरीचे युवा नेते सिद्धेश राजाराम ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनावश्यक खर्च टाळून मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वखर्चाने वडगाव शहरातील एका कष्टकरी व होतकरू असलेल्या थोरात कुटुंबीयांना फिरता व्यवसाय करण्यासाठी हातगाडी व भाजीपाल्यासह वजनकाटा इत्यादी गोष्टी भेट दिल्या.

Pimpri : राष्ट्राचा खरा इतिहास कलावंतांच्या कलाकृतीमध्ये अधिक आढळतो – जेम्स कझिन्स

यावेळी मावळ तालुका काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुभाषराव जाधव,नगराध्यक्ष मयुर ढोरे, माजी उपसरपंच बापूसाहेब वाघवले, पोटोबा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त अरुण चव्हाण, नगरसेवक राजेंद्र कुडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण,शांताराम कुडे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय ढोरे,सुरेश जांभुळकर,सामाजिक कार्यकर्ते सुरेश कुडे, कदम मामा, पत्रकार विजय सुराणा,गणेश जाधव,अरूण कालेकर,विशाल शिंदे,सौरभ ढोरे, सुमीत ढोरे,गौतम सोनवणे, खंडुजी जाधव,प्रणव ढोरे,राहील तांबोळी आणि मोरया प्रतिष्ठानचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वडगाव शहरातील या गरजू कुटुंबाला व्यवसायासाठी देण्यात आलेल्या हातगाडीचे मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन (Vadgaon Maval)करून नूतन व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी थोरात कुटुंबियांनी मोरया प्रतिष्ठानचे तसेच सिद्धेश ढोरे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.