Hinjawadi : पत्नीच्या प्रियकराचा खून करून मृतदेह मुळशी धरणात टाकला

एमपीसी न्यूज – पत्नीच्या प्रियकराचा (Hinjawadi)  खून करून मृतदेह मुळशी धरणात टाकला. याप्रकरणी आरोपी पतीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.

किशोर प्रल्हाद पवार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अक्षय भास्कर खिल्लारे (वय 21, रा. बालेवाडी, मूळ रा. हिंगोली) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 सप्टेंबर रोजी किशोर पवार हे बेपत्ता असल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल होती. त्याबाबत तपास करत असताना चौकशीत अक्षय खिल्लारे याचा पोलिसांना संशय आला. त्यावरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. त्यावेळी बेपत्ता असलेल्या किशोर याचा आपण खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

आरोपी अक्षय याच्या पत्नीसोबत मयत किशोर पवार याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय अक्षय याला होता. त्यातून त्याने किशोर यांना जीवे मारण्याचा कट रचला. 24 सप्टेंबर रोजी त्याने किशोर यांना दुचाकीवरून सुसगाव येथून वारक गावात मुळशी धरणाच्या बाजूला नेले.

Maharashtra : सोयाबीनवरील रोगाच्या प्रादुर्भावाचे होणार पंचनामे

तिथे लघुशंका करण्याच्या बहाण्याने थांबून सोबत आणलेल्या विळ्याने किशोर पवार यांच्या मानेवर, चेहऱ्यावर वार करून (Hinjawadi) त्यांचा खून केला. त्यानंतर किशोर यांचे हात-पाय बांधून मृतदेह वारक गावातील मुळशी धरणाच्या पाण्यात टाकला असल्याचे अक्षय याने तपासात सांगितले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=pKBjF3ikCxc

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.