Maval : शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने टाकवे (Maval) गावातील दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक उपक्रम राबविले जात असतात. विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस मंडळाचे संस्थापक टाकवे गावचे माजी उपसरपंच स्वामी जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यापारी असोसिएशन अध्यक्ष योगेश मोढवे, शिवशाही मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रदीप मोढवे, माजी अध्यक्ष व टाकवे (Maval) विविध कार्यकारी सोसायटीचे माजी संचालक दिलीप आंबेकर, ग्रामपंचायत माजी सदस्य नवनाथ आंबेकर, सचिव बाबाजी असवले, उपाध्यक्ष रोहीदास खुरसुले, टाकवे विविध कार्यकारी सोसायटी माजी चेअरमन विकास असवले, मंडळाचे खजिनदार लक्ष्मण कुटे, चंद्रकांत तळपे, नितीन भांगरे, विष्णू लोंढे, संभाजी धामणकर,उद्योजक दत्ता गायकवाड उपस्थित होते.
अथर्व जगताप (90.40 टक्के), प्रेरणा जाधव (88.60 टक्के), श्री शिंदे (87.60 टक्के), चंदना जगताप (87 टक्के), निसर्गा वाजे (87 टक्के), केतन मोढवे (81 टक्के), सिध्दी कालेकर, आदित्य धामणकर, गणेश क्षीरसागर आदी विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
शिवशाही मित्रमंडळ दरवर्षी, शिवजयंती, श्रीगणपती उत्सव, गणेश जयंती, शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थांचा गुण गौरव कार्यक्रम, आरोग्य विषयक उपक्रम असे विविध सामाजिक कार्यक्रम घेतले जातात.