Dehu road : बंद घरातून 1.25 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज : बंद घरातून चोरट्याने 1.25 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरल्याची घटना देहू रोड येथे घडली आहे. (Dehu road) याप्रकरणी देहू रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मरी आप्पा विरप्पा, वय 51 वर्ष, रा. थॉमस कॉलनी, देहू रोड यांनी देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri News : अर्थसंकल्पासाठी दहा लाखांपर्यंतची कामे सूचवा, आयुक्तांचे नागरिकांना आवाहन  

फिर्यादी यांचे राहते घर 7 ते 16 नोव्हेंबर 2022 कुलूप लावून बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील 15 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने (Dehu road) व रोख रक्कम असा एकूण 1.25 लाख रुपये किंमतीचा ऐवज घरफोडी  करून चोरून नेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.