Igatpuri News : दौंडत ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांसाठी पाणी शुद्धीकरण प्रकल्प व शालेय विद्यार्थ्यांना बेंचेस, प्रोजेक्टर

एमपीसी न्यूज – इगतपुरी तालुक्यातील दौंडत ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून आपल्या ग्रामस्थांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले.

तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बेंचेस उपलब्ध करून दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी थर्मामिटर व ऑक्सिमिटरही ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिले. याबरोबरच ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतींच्या 5 टक्के राखीव दिव्यांग कल्याण निधीतून ज्ञानेश्वर तुकाराम शिंदे या युवकास पाच हजाराचा निधी सुपूर्द केला.

या उपक्रमाप्रसंगी सरपंच विठाबाई पांडुरंग शिंदे, उपसरपंच संजय बोराडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात आशा सेविका बेबी अशोक बोराडे, नंदा वाळू बोराडे यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. नागरिकांना कोरोना होऊन नये, गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याची काळजी घेतानाच त्यांनाही कोरोनाचा प्रसंगाला सामोरे जावे लागले.

गावात विविध विकासाच्या योजना राबविल्या जात असून त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, पंचायत समिती सदस्या विमल तोकडे यांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल शिंदे, शांताबाई शिंदे, मीराबाई बोराडे, मीराबाई शिंदे, सुनीता शिंदे, ग्रामसेवक हांडगे, माजी सरपंच विठोबा शिंदे, पांडुरंग शिंदे यांच्यासह नामदेव शिंदे, कचरू शिंदे, पंढरी बोराडे, बबलू जगताप, सोनू जगताप, रामचंद्र जगताप, गुलाब जगताप, सरुबाई गावंडे, ज्ञानेश्वर शिंदे, तुकाराम शिंदे, बाळू शिंदे, आशाबाई शिंदे, बेबी शिंदे, मुख्याध्यापक देविदास शिंदे, शिक्षक नीता चौधरी, स्वाती बागुल, मनोज बोराडे, देवराम गावंडे, सुरेश बोराडे, गंगाराम बोराडे, शशिकांत शिंदे रंगनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.