Pune News : मिनरल वॉटर जार निर्मिती क्षेत्रात बेकायदेशीर कामाला पाठिंबा देणार नाही : छत्रपती संभाजीराजे 

एमपीसी न्यूज – मिनरल वॉटर जार निर्मिती क्षेत्रात केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानग्या घेऊनच व्यवसाय करावा ही महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनची भूमिका योग्य असून बेकायदेशीर कामाला माझा पाठिंबा देणार नाही,’ असे आश्वासन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिले. 

महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष विजयसिंह डुबल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने संभाजीराजे यांची भेट गुरुवारी  घेतली, त्यांनतर झालेल्या चर्चेत त्यांनी हे आश्वासन दिले.

 

राष्ट्रीय हरित प्राधिकरणात असोसिएशन ने बेकायदेशीर कुल जार मधील पाणी निर्मिती चे प्रकल्प बंद करण्याविषयी याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल असोसिएशन च्या बाजूने लागला आणि बेकायदेशीर प्रकल्प बंद करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. ही प्रशासकीय प्रक्रिया सुरु झाली आहे. तरीही काही जण बेकायदेशीर प्रकल्प चालू ठेवत असतील तर ते कारवाईस पात्र ठरतील, अशी भूमिका विजयसिंह डुबल यांनी या भेटी दरम्यान मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.