Pune : मी काही आतंकवादी आहे का ? – चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण

मी ज्या-ज्या राज्यात गेलो , तिथे भाजपचा पराभव झाला

एमपीसी न्यूज – कोरेगाव भीमा येथे दंगल घडवणारे आरोपी भिडे आणि एकबोटे हे खुले आम फिरत आहे. आणि मला नजरकैदेत ठेवले गेले. मी काही आतंकवादी आहे का ? असा सवाल भीम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांनी उपस्थित केला . पुण्यातील महात्मा फुले वाडा , लाल महाल या स्थळांना भीम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांनी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण म्हणाले की, भीमा कोरगावला जाण्यापासून मला कोणी रोखू शकत नाहीत. मी त्या ठिकाणी जाणार असून आता महाराष्ट्रात भीम आर्मी संघटन मजबुत करणार आहे. माझा काही गुन्हा नसताना मला नजरकैदेत ठेवण्यात आले. मुंबई आणि पुण्यात भाषण करून दिले नाही. राज्यात हुकुमशाही सुरू आहे. भाजपचा महाराष्ट्रात पराभव निश्चित आहे . मी ज्या-ज्या राज्यात गेलो , तिथे भाजपचा पराभव झाला आहे. आता महाराष्ट्रात आलो आहे. तर इथे देखिल भाजपचा पराभव निश्चित आहे . भिडे आणि एकबोटे यांना अटक झाली पाहिजे.  अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच त्यांनी अनेक मुद्यावर भूमिका देखील मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.