Alandi : आळंदीमध्ये शनिवारी प्रहार जनशक्ती आयोजित अपंग क्रांती मेळावा तर रविवारी कार्यकर्ता व पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi) येथील फ्रूटवाले धर्मशाळे मध्ये प्रहार जनशक्ती पक्ष,महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू  यांच्या संकल्पनेतून दि.18 ऑगस्टला दिव्यांग बांधवां करिता मुक्तमंथन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दि.19 ऑगस्ट रोजी प्रहार क्रांती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Chinchwad : आता वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा तुमचा वाहन चालविण्याचा परवाना होईल रद्द

त्या निमित्त  दिव्यांग सक्षमीकरण क्षेत्रात चार दशके कार्यरत असणारे प्रमोद देशपांडे हे दिव्यांग बांधव आयुष्याला सामोरे जाताना   या विषयावर भाष्य करतील. दुसरे व्यक्ते नंदकुमार फुले सेवानिवृत्त महाव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मुबंई हे दिव्यांगासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना याबाबत  भाष्य करतील.

गणेश शिंदे प्रसिद्ध व्याख्याते हे जीवन सुंदर आहे या विषयावर उदबोधन करणार आहे.प्राध्यापक विजय नवले करिअर मार्गदर्शक हे दिव्यांग बांधवांसाठी शिक्षणातील संधी व करिअरच्या विविध वाटा यावर प्रकाश टाकतील. अमित मखरे संस्थापक चावडी हे आपल्या शैलीतून दिव्यांग बांधवांना व्यवसाय क्षेत्रातील संधी याबाबत मार्गदर्शन करतील. श्रीराम सातपुते हे दिव्यांगांसाठी खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधी व त्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य याबाबत मार्गदर्शन करतील.

दि.19 ला पूर्ण वेळ प्रशिक्षण झाल्यानंतर दु.4 वा. दिव्यांग बांधवांचा समारोपीय कार्यक्रम राहणार आहे. प्रहार पार्टी कार्यकर्ता व पदाधिकारी प्रशिक्षण  शिबिर करिता येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मुक्तमंथन 19 ऑगस्ट सायंकाळी 5 वा.राहणार आहे.

दि.20 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वा. बच्चू कडू व मा. आ.राजकुमार पटेल यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रमुख व्यक्तांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम आयोजित केला आहे.

तो असा की , अरुण अडसूळ  माजी सदस्य एम पीएससी माजी कुलगुरू पुणे विद्यापीठ हे कार्यकर्ता भूमिकेला न्याय देताना या विषयावर कार्यकर्त्यांसमोर मार्गदर्शन करतील. इंद्रजित देशमुख माजी अति.मुख्य कार्यकारी अधिकारी हे माणूस म्हणून कस जगावं या विषयाची मांडणी करतील.प्रशांत पुप्पळ रामकृष्ण मठ,शिवभावे जिवसेवा याबविष्याची कार्यकर्त्यांसमोर मांडणी करतील.

प्रा. विजय नवले प्रेरणादायी व्याख्याते  विषय-कार्यकर्ता कर्तृत्व आणि वक्तृत्व यावर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतील .निनाद सुमंत मुख्य तंत्रज्ञान अधिकारी हे माहिती तंत्रज्ञान नव्या युगाचा आरंभ यावर कार्यकर्त्यांना भाष्य करतील. नयन गुरव सोशल मीडिया एक्सपर्ट सोशल मीडियाची ताकद आणि मी यावर कार्यकर्त्यांना माहिती देतील.दु.4 वा. कार्यक्रमाचा समारोप होईल.याबाबत माहिती संजय गोमकाळे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.