Chinchwad : आता वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा तुमचा वाहन चालविण्याचा परवाना होईल रद्द

एमपीसी न्यूज – वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या (Chinchwad) वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मोहीम पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. अनेकदा दंड करूनही संबंधित वाहन चालक नियम पाळत नसेल तर अशा वाहन चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना थेट रद्द करण्याची मोहीम सुरु केली आहे.

शहरात चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे लगेच कॅमेऱ्यात कैद होतात. सिग्नल जंप करणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, वाहन चालवताना फोनवर बोलणे, काळ्या काचा, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, वाहनाच्या पार्ट मध्ये बदल करणे अशा अनेक बाबींसाठी वाहतूक पोलीस वाहन चालकावर दंड करतात.

प्रत्यक्ष वाहने अडवून चलन करताना अनेक वाहन चालक हुज्जत घालतात. त्यामुळे आता पोलिसांनी ऑनलाईन चलन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ऑनलाईन चलन आल्यास वाहन चालक त्याकडे दुर्लक्ष करतात. पुढे न्यायालयाकडून नोटीस आल्यानंतर धावपळ करतात. त्यामुळे अनेकदा दंड करूनही नियम न पाळणारे आता वाहतूक पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या 600 वाहन चालकांची यादी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) पाठवली आहे. आरटीओ कडून त्यातील 200 जणांचे वाहन चालविण्याचे परवाने तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आले आहेत. वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविल्यास अनेक पटींनी अधिक दंड भरावा लागतो. त्यामुळे अशा वाहन चालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या मार्गाचा अवलंब केला आहे.

Chinchwad : पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा पण…

वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे (Chinchwad) म्हणाले, “नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे अपघाताची शक्यता वाढते. शिवाय वाहतुकीला शिस्त राहत नाही. नागरिकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्यास कठोर कारवाई केली जाईल. ही कारवाईची मोहीम यापुढे देखील सुरु राहणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियामचे पालन करावे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.