Wakad : दांडीयाच्या कार्यक्रमात टोळक्याचा धारदार हत्यांरासह धुडगूस

एमपीसी न्यूज – पुर्ववैमनस्यातून नवरात्र महोत्सवाच्या दांडीच्या कार्यक्रमात चार जणांच्या टोळक्याने धारदार हत्यांरासह धुडगूस घालत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. तसेच नागरिकांना शिवीगाळ करत दांडियाचा कार्यक्रम बंद पाडला. हा प्रकार शनिवारी (दि.13) रात्री पावणे दहाच्या सुमारास कलाटेनगर, वाकड येथे घडला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

भो-या घाडगे, आकाश उर्फ विंचू मकासरे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांचे साथीदार अशोक तुपेरे, राज कांबळे (सर्व रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) यांच्याविरोघात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नितीन विजय पटेकर (वय 31, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन पटेकर आणि आरोपी यांच्यात पुर्वी भांडणे झाली होती. त्यावरुन त्यांच्यात वैमनस्य होते. पटेकर यांनी नवरात्र महोत्सावाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त शनिवारी रात्री दांडिया चालू होता. रात्री पावणे दहाच्या सुमारास अचानक आरोपी हातामध्ये लोखंडी तलवार, रॉड, लाकडी दांडके घेऊन तिथे आले. हत्यारांचा नंगानाच करत शिविगाळ केली. दहशत माजवित नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले. तसेच दांडिया कार्यक्रम बंद पाडला. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस. घोळवे पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.