Pimpri : आयकर, पीसीएमसी अकादमीचा सहज विजय

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी

एमपीसी न्यूज : आयकर, पुणे आणि पीसीएमसी (Pimpri) संघांनी सहज विजयासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेत आपल्या मोहिमेस सुरुवात केली.

नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत आयकर संघाने पहिल्या सामन्यात हॉकी लव्हर्स अकादमीचा ५-० असा पराभव केला. पूर्वार्धातील पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर नितिन नंदनदोरीने १८व्या मिनिटाला गोल करून आयकर संघाचे खाते उघडले. त्
यानंतर दोनच मिनिटांनी २०व्या मिनिटाला आशुतोष लिंगेशने संघाची आघाडी वाढवली. सामन्याच्या मध्यंतरापूर्वीच २८व्या मिनिटाला अथर्व कांबळेने तिसरा गोल करून आयकर संघाचा विजय जवळ जवळ निश्चित केले.
उत्तरार्धात ३७व्या मिनिटाला अथर्वने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा गोल केला. सामन्यातील वेग आणि आक्रमकता कायम राखत ५७व्या मिनिटाला अजितेश रॉयने आणखी एक गोल करून आयकरच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्यानंतर, दुसऱ्या सामन्याच पीसीएमसी संघाने अजिंक्य नाईकनवरेच्या दोन गोलच्या जोरावर फ्रेण्डस युनियन संघाचा ४-१ असा पराभव केला. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात २६व्या मिनिटाला ऋतिक कांबळे आणि ३०व्या मिनिटाला सौरभ पाटिलने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून पीसीएमसी संघाला मध्यंतराला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात पीसीएमसी संघाने आणखी दोन गोल केले. अजिंक्यने ४४ आणि ५४व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी भक्कम केली. या दरम्यान ५२व्या मिनिटाला अफताब शेखने गोल करून फ्रेंडस युनियनचे खाते उघडले होते.
त्यापूर्वी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा समितीचे अध्यक्ष महेंद्र निकाळजे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. या वेळी दीपा निकाळजे आणि स्पर्धा समितीचे उपाध्यक्ष सुनिल रणपिसे उपस्थित होते.
निकाल
आयकर, पुणे ५ (निखिल नंदनदोरी १८वे, आशुतोष लिंगेश २०वे, अथर्व कांबळे २८वे, ३७वे आणि अजितेश रॉय ५७वे मिनिट) वि.वि. हॉकी लव्हर्स अकादमी ०. मध्यंतर ३-०
पीसीएमसी अकादमी ४ (ऋतिक कांबळे २६वे, सौरभ पाटिल ३०वे (कॉर्नर), अजिंक्य नाईकनवरे ४४, ५४वे मिनिट) वि.वि. फ्रेंण्डस युनियन १ (अफताब शेख ५२वे मिनिट) मध्यंतर २-०
आजचे सामने
एक्सलन्सी अकादमी वि. रेल्वे पोलिस लाईन बॉईज १.३० वा.
खडकी हॉकी अकादमी वि. हॉकी लव्हर्स स्पोर्टस क्लब दु. ३.०० वा.
https://youtu.be/PbhhIh-_mHY

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.