PCMC : महापालिका तिजोरीत महिनाभरात 65 कोटी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेस मिळकतकर बिलातून ( PCMC)पहिल्या एका महिन्यात एकूण 65 कोटींचा भरणा झाला आहे. एकूण 56 हजार 815 मिळकतधारकांनी बिल भरत सवलतीचा लाभ घेतला आहे.

सर्वांधिक 47 हजार 415 जणांनी ऑनलाइन माध्यमातून बिल भरले आहेत. तो एकूण भरणा सर्वांधिक 52 कोटी 63 लाख इतका आहे. रोखीने 6 हजार 650 जणांनी एकूण 6 कोटी 53 लाखांची बिले भरली आहेत. धनादेशाद्वारे 1 हजार 361 जणांनी 3 कोटी 95 लाखांचा भरणा केला आहे. ईडीसीने 703 जणांनी एकूण 72 लाख 67 हजारांची बिले भरली आहेत. डीडीद्वारे केवळ 9 जणांनी 11 लाख 50 हजारांची बिले भरली आहेत.

PCMC :  पिण्याचे पाणी वापरणाऱ्या वॉशिंग सेंटर चालकांवर गुन्हे दाखल होणार,  मीटर निरीक्षकांवरही कारवाई

बिल भरणा करण्यात निवासी मिळकती सर्वांधिक 53 हजार 78 आहेत. त्यांनी 52 कोटी 78 लाखांचा भरणा केला आहे. तर, बिगरनिवासी 2 हजार 666 मिळकती आहेत. त्यांनी 7 कोटी 75 लाखांचा भरणा केला आहे. औद्योगिक 187 मिळकती, मिश्र 656 मिळकती आणि मोकळ्या जमिनी 246 जणांनी बिले भरली आहेत. सर्वांधिक 15 कोटी 16 लाखांचा भरणा वाकड विभागीय करसंकलन कार्यालयात झाला आहे. तेथे 11 हजार 66 जणांनी कर भरला आहे.

थेरगाव विभागीय कार्यालयात 6 हजार 157 जणांनी एकूण 7 कोटी 5 लाखांचा भरणा केला आहे. पिंपरी गावातून 6 कोटी 15 लाख आणि सांगवी कार्यालयातून 6 कोटी 4 लाखांचा भरणा झाला आहे. सर्वांत कमी भरणा पिंपरी कॅम्प व तळवडे कार्यालयात ( PCMC) झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.