PCMC :  पिण्याचे पाणी वापरणाऱ्या वॉशिंग सेंटर चालकांवर गुन्हे दाखल होणार,  मीटर निरीक्षकांवरही कारवाई

एमपीसी  न्यूज  –  महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत पिंपरी-चिंचवड शहरातील वॉशिंग सेंटरचे सर्वेक्षण केले असून सर्वेक्षणात शहरात तब्बल 387 वॉशिंग सेंटर आढळले. त्यापैकी  36 सेंटरचे नळ कनेक्‍शन तोडण्यात आले आहे. तर, 39 सेंटर अनधिकृत आढळून आले.(PCMC) या सर्व सेंटर चालकांकडून पाणीपट्टी वसुल करण्यात येणार असून गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले. मीटर निरीक्षकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील वॉशिंग सेंटर चालक मोटारी धुण्यासाठी पाणी कोठून वापरतात? याचा शोध घेण्यासाठी पाणी पुरवठा विभागाच्या वतीने शहरातील वॉशिंग सेंटरचे फेर सर्वेक्षण करण्यात आले. शहराच्या विविध भागात 387 सेंटर असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. यामध्ये 38 वॉशिंग सेंटर चालकांनी पाणी वापरासाठी व्यावसायिक परवाना घेतला आहे. 290 सेंटर चालक बोअरवेल, विहीर पाण्यावर अवलंबून आहेत.

Pune : गौरव बापट भाजपच्या पोटनिवडणुकीचे पुढचे उमेदवार?

39 सेंटर अनधिकृत आढळून आले असून 36 जणांचे नळ कनेक्‍शन तोडण्यात आले आहे. अशा सेंटर चालकांकडून पाणीपट्टी दंडासह वसुल करण्यात येणार आहे. (PCMC) त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच अशा वॉशिंग सेंटर चालकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या मीटर निरीक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील यांनी दिली.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.