Pune : गौरव बापट भाजपच्या पोटनिवडणुकीचे पुढचे उमेदवार?

एमपीसी न्यूज : पुण्यातील पुढच्या पोटनिवडणुकीच्या (Pune) चर्चेला आता सुरुवात झाली आहे. अचानक भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवंगत गिरीश बापट यांच्या घरी भेट दिल्याने नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गिरीश बापट यांचे  चिरंजीव गौरव बापट यांची भेट घेतल्याने भाजपकडून उमेदवारी त्यांना दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, भाजपकडून अधिकृतरित्या भूमिका स्पष्ट झालेली नाही. 

कसबा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या जागी त्यांच्या कुटुंबाबाहेर भाजपने  (Pune) उमेदवारी दिल्याने भाजप सहानुभूतीच्या मतांना मुकल्याने गौरव बापट यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.