Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे शांतीनाथ जैन मंदिर व आदिनाथ जैन मंदिरात स्वातंत्र्य दिन साजरा

एमपीसी न्यूज – श्री शांतीनाथ जैन मंदिर परिसरात साधुजी श्रीमुनि हिरसागरजी म.सा. च्या मुख्य अतिथीत देशभक्तीचा, ध्वजरोहणाचा कार्यक्रम संपन्न (Talegaon Dabhade) झाला.

Kivle : एकाच जमिनीचा दोन वेळा व्यवहार, चौघांवर गुन्हा दाखल

यावेळी शेकडो जैन बांधव, जैन सकल संघ, नुतन ट्रस्ट मंडळ, श्री धर्मनाथ जैन युवक मंडळ, श्री ऋषभ शांती विहार सेवा ग्रुप, श्री जैन महिला मंडळे यांच्या उपस्थितीत ध्वजरोहणाचा कार्यक्रम साजरा झाला. या वेळेस आलेल्या शेकडो लोकांना कळी (बुंदी), शेव ची पाकिटे वाटण्यात आली. अशी माहीती श्री. शांतिनाथ आदिनाथ जैन सकल संघातर्फे देण्यात आली.

स्वातंत्र दिनानिमित्त श्री आदिनाथ जैन धर्मशाळेत मुनि हिरसागरजी म.सा.च्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भरपूर जैन श्रावक -श्राविका, जैन सकल संघ, नुतन ट्रस्ट मंडळ, श्री धर्मनाथ जैन युवक मंडळ, श्री ऋषभ शांती विहार सेवक यांनी शिबीराचे आयोजन केले होते. हया शिबीरास 30 लोकांनी रक्तदान केले.

रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रक व एक पेन सेट डॉक्टर, नर्स, मेडिकलवाले यांच्या हस्ते देण्यात आले. अशी माहिती श्री. शांतिनाथ आदिनाथ जैन सकल संघातर्फे देण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.