PCMC : किटकजन्य, जलजन्य आजारांच्या रुग्णांची माहिती द्या; पालिकेचे खासगी रुग्णालय, प्रयोगशाळांना आवाहन  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व क्लिनीक पॅथालॉजी लॅब यांनी किटकजन्य, जलजन्य आजारांच्या रुग्णांची माहिती देण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Pune Metro News : पुणे-पिंपरी चिंचवड शहरे एक ऑगस्ट पासून मेट्रोने जोडली जाणार

सध्या सुरु आलेल्या पावसाळयाच्या पार्श्वभुमीवर सर्व खासगी वैद्यकीय व्यवसायीकांना व क्लिनिक पॅथालॉजी लॅब यांनी किटकजन्‍य व जलजन्य आजाराचा रुग्ण आढळून आल्यास/ दाखल झाल्यास त्याची परिपूर्ण माहिती (दवाखान्याचे नाव, रुग्णाचे नाव, वय पत्ता, उपचार घेतल्याची तारीख, रिपोर्ट तारीख) त्वरीत पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागास कळविणे. महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनियम २०२१ (सुधारित) या कायद्यानुसार सर्व अहवाल विहित मुदतीत कळविणे बंधनकारक आहे.

कॉलरा (पटकी), जापनीज इन्सेफलायटीस, डेंग्यू , संसर्गजन्य काविळ, गॅस्ट्रोइंट्रायटीस, लेप्टोस्पायरोसिस, मलेरीया, चिकुनगुनिया, शासन अधिसुचित करेल अशा इत्यादी आजारांचा समावेश आहे. रुग्णालयामध्ये रुग्ण आढळुन आल्यास/दाखल झाल्यास त्याची परिपूर्ण माहिती झोनल रुग्णालयाच्या ई-मेल आयडीवर व त्यानंतर लेखी स्वरुपात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संबधित झोनल रुग्णालयास कळवावी.

 

आपल्याकडुन वेळेत माहिती देण्यास, टाळाटाळ झाल्यास किंवा दुर्लक्षित झाल्यास महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनियम २०२१ सुधारित तसेच साथरोग अधिनियम १८९७ नुसार कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.