BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : सहभागी व्हा एमपीसी न्यूजच्या ऑनलाईन गणेशोत्सवात!

एमपीसी न्यूज – ‘एमपीसी न्यूज’ने नुकतीच अकरा वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून बाराव्या वर्षात पदार्पण केले आहे. मागील अकरा वर्षात एमपीसी न्यूजने वाचकांशी नाळ जोडण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. यावर्षी एमपीसी न्यूज आपल्या सर्व वाचकांना गणेशोत्सवात सहभागी करून घेण्यासाठी ‘एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा’ ही संकल्पना राबवत आहे. यामध्ये सर्व वाचकांना आपल्या घरचा गणपती एमपीसी न्यूजच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याची अनोखी संधी मिळणार आहे.

घराघरात आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे ‘गणेशोत्सव’. प्रत्येक घरी विशिष्ट विषयांवर आधारित आकर्षक सजावट केली जाते. बाप्पापुढे केल्या जाणा-या सजावटीमधून समाजात चांगला विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. याच प्रयत्नांना एमपीसी न्यूज बळ देणार आहे. प्रत्येकाच्या घरातील बाप्पा एमपीसी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण जगभर दाखवले जाणार आहेत.

आपल्या घरातील, सोसायटी मधील, मंडळांच्या बाप्पांचा तसेच गणेशोत्सवातील सजावटीचा फोटो एमपीसी न्यूजला पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. फोटोसह आपले नाव, पत्ता आणि थोडक्यात माहिती आम्हाला पाठवावी. आपल्या बाप्पाचा फोटो, आपल्या नावासह mpcnews.in या आमच्या प्रसिद्ध मराठी पोर्टलवर अपलोड करण्यात येईल.

आपल्या बाप्पाचे फोटो, नाव, पत्ता आणि थोडक्यात माहिती [email protected] आणि [email protected] या मेल आयडीवर पाठवावेत.

Advertisement