Kabbadi Competition : किशोर गटात परभणी व अहमदनगर तर किशोरी गटात सांगली व मुंबई उपनगर

एमपीसी न्यूज : अहमदपूर (लातुर) येथील महात्मा गांधी महाविद्यलयाच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या लातुर जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित 33 वी (Kabbadi Competition) महाराष्ट्र राज्य किशोर व किशोरी गट अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात किशोर गटात परभणी, अहमदनगर, तर किशोरी गटात मुंबई उपनगर, सांगली उपांत्य फेरीत दाखल झाले.

किशोर गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात परभणी संघाने पुणे संघावर 32-31 अशी अवघ्या एक गुणांनी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मद्यंतराला परभणी संघ 16-17 अशा एक गुणांनी पिछाडीवर होता. मध्यतरानंतर परभणीच्या विजय तरे याने अत्यंत संयमी खेळ करीत बोनस मिळवत विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला अमित कांबळे याने चांगल्या पकडी घेत मोलाची साथ दिली.

पुण्याच्या चढाई पटू रोहित चव्हाण याला शेवटच्या चढाईत गुण मिळविता न आल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पुण्याच्या संघाने दोन लोन लावूनही त्यांना विजय मिळविण्यात मिळाले नाही. पुण्याच्या श्रीधर कदम याने चौफेर चढाया करीत परभणीचा बचाव भेदला होता. रिषभ वाळूंज याने ही त्याला चांगली साथ दिली. मात्र परभणीच्या सांघिक संयमी खेळापुढे पुण्याच्या खेळाडूंना हार मानावी लागली.

Pune News : पुणे जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

किशोरी गटात- सांगली संघाने कोल्हापूर संघावर 44-23 अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला सांगली संघाकडे 26-15 अशी आघाडी होती. सांगलीच्या श्रावणी भोसले, श्लोका पानबुडे यांनी जोरदार खेल करीत आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. (Kabbadi Competition) त्यांना रिया हिप्परकर, अनिषा पवार हिने सुरेख पकडी घेत चांगली साथ दिली. कोल्हापूरच्या समृध्दी बनसोडे व अलहिदा शेख यांनी खोलवर चढाया करीत चांगला प्रतिकार केला. तर स्वामिनी गावडे व अक्षता कामथे यांना सांगलीच्या आक्रमणाला थोपविता आले नाही.

त्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या उपउपात्य सामन्यात मुंबई उपनगर संघाने मुंबई शहर संघावर 26-24 अशी मात करीत उपात्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला मुंबई उपनगर संघ 7-17 असा पिछाडीवर होता. मध्यंतरानंतर उपनगरच्या जागृती नांदिवकर, नेडा पांडव यांनी अत्यंत वेगवान खेळ करीत चौफेर हल्ला चढविला. तर शलाका मढेकर व पूजा चिंदरकर यांनी शहरचे आक्रमण परतवून लावत विजय मिळविला.

मुबंई शहरच्या आदिती काविलकर व सलोनी पाटील यांनी सामन्याच्या पहिल्या डावात जोरदार हल्ला चढवित आघाडी घेतली होती. त्यांना रिया मेहरोलीया यांनी सुरेख पकडी घेतल्या. मात्र मद्यंतरानंतर त्यांना ही आघाडी टिकविता नाही. परिणामी त्यांना पराभवाला पत्करावा लागला. परभणी संघाने पुणे संघावर 35-34 असा निसटता विजय मिळवित उपात्य फेरीत प्रवेश केला.  मध्यंतराला परभणी संघ 16-21 असा पिछाडीवर होता.

मात्र मद्यंतरानंतर नेहा राठोड व समिक्षा तरे यांनी केवळ बोनस गुणांवर खेळ करीत आपल्या संघाची पिछाडी भरुन काढली. त्यांना विशाखा पोले हिने उत्कृष्ठ पकडी घेतल्या.(Kabbadi Competition)  पुण्याच्या श्रावणी सावंत हिने चौफेर चढाया करीत सुरेख खेळ केला. सुजाता पवार व तनिष्का सिंग यांना मात्र त्यांना परभणीचे आक्रमण थोपविण्यात यश न आल्याने त्यांना केवळ एक गुणाने पराभव पत्करावा लागला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.