Pune News : धायरी येथे सदनिकेस आग; पती-पत्नी जखमी

एमपीसी न्यूज : पुण्यात डिएसके विश्वजवळ असलेल्या गणेश नक्षत्र को ऑप सोसायटी येथे 11 व्या मजल्यावरील सदनिकेत घरातील गॅस सिलेंडर मधून वायु गळती (Pune News) झाल्याने आग लागली. या घटनेत पत्नी आणि पती जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री 7.30 च्या सुमारास घडली. आगीची माहिती मिळताच नवले आणि सिहंगड अग्निशमन केंद्रातून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले असून कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

आरती राहुल साळवी (वय 37), राहुल दिलिप साळवी – (वय 40) अशी या घटनेत जखमी झालेल्या नवरा बायकोची नावे आहेत. साळवी दाम्पत्य हे धायरीतील गणेश नक्षत्र को ऑप सोसायटी येथे इमारतीच्या 11 व्या मजल्यावर सदनिकेमधे रहातात. आरती साळवे या किचनमध्ये काम करत असतांना अचानक सिलेंडर टाकीतून गॅस गळती झाली. सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने आरती साळवी यांच्या कपड्यांना देखील आग लागली. यावेळी राहुल साळवी हे आरती यांना वाचवण्यासाठी गेले. यात दोघेही जखमी झाले.

Pimpri News : पिंपरी-चिंचवडच्या पोलीस सह आयुक्तपदी मनोज लोहिया यांची नियुक्ती

दरम्यान, आगीने उग्र रूप धारण केले. या घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच जवानांनी धाव घेतली. त्यांनी सदनिकेत प्रवेश केला असता तिथे स्वयंपाक घरात घरगुती वापराच्या सिलेंडर मधून वायू गळती होऊन आग लागली होती. (Pune News) स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करुन आग पुर्ण विझवली व घरातील इतर दोन सिलेंडर बाहेर काढत धोका दुर केला.

सिलेंडर संपल्याने नवीन सिलेंडर जोडत असताना मोठ्या प्रमाणात वायू गळती होऊन जवळच असलेल्या पणतीमुळे आग लागली. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले आहे. या आगीमुळे स्वयंपाक घरातील भिंतीला तडे जाऊन घरगुती साहित्याचे बरेच नुकसान झाले आहे.

या कामगिरीत नवले अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रकाश गोरे व तांडेल शिवाजी मुजूमले जवान भरत गोगावले, शिवाजी आटोळे विक्रम मच्छिंद्र, औंकार लोखंडे, आदित्य मोरे यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.