Kamshet : विनोद कथन स्पर्धेत सुमेध कुलकर्णी व भूमिका राणे प्रथम

एमपीसी न्यूज- स्मित कला रंजन यांच्या वतीने कामशेत येथे विनोद कथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमेध कुलकर्णी व भूमिका राणे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत कामशेत व परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.

स्पर्धेचे उदघाटन सरपंच रुपाली शिनगारे व उपसरपंच संतोष कदम, गणपत शिंदे, रुपेश उर्फ सोनू गायकवाड यांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठ्यांची गौरव गाथा या महानाट्याचे लेखक दिग्दर्शक प्रवीण देशमुख, जाणता राजाचे कलाकार सुहास धस, संतोष कुंभार, कामशेत लायन्स क्लब अध्यक्ष प्रताप गुंजाळ,कामशेत पी.एस आय सुरेखा शिंदे अॅड.यशवंत गोरे, ग्रा.पं.सदस्य नाणे दत्ता म्हाळस्कर, निलेश दाभाडे राजू अगरवाल, अजय भवार, सचिन भवार आदी उपस्थित होते.

स्पर्धेचे परीक्षण लोणावळा येथील व्ही.पी.एस. शाळेचे मुख्याध्यापक व्ही.टी. जोरी व अॅडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालय मधील शिक्षिका एस. पी. देशपांडे यांनी केले. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष शिवानंद कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन योगेश देसाई, अंकुश काटकर, विपुल जाधव, सचिन कांबळे, सुमेध गायकवाड, मूर्ती मुदलियार, दिनेश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल साळवे यांनी केले. रमेश ओव्हाळ यांनी आभार मानले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

5 वी ते 7 वि गट-

प्रथम- सुमेध कुलकर्णी
द्वितीय- संस्कृती साबळे
तृतीय- आदित्य भालेराव.
उत्तेजनार्थ- अन्सूर ठाकूर व समृद्धी कदम

8 वी ते 10 वी गट

प्रथम- भूमिका राणे,
द्वितीय- हरीश कोंडे,
तृतीय- तन्वी पोकळे
उत्तेजनार्थ वैष्णवी मानकर व वेदिका शिंदे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.