Vadgaon Maval : स्मित कला रंजन आयोजित डान्स मावळ डान्स या मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या नृत्य स्पर्धेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – वडगांव मावळ येथील स्व. अनंत राजमाचीकर काका सभा मंडपात स्मित कला रंजन आयोजित डान्स मावळ डान्स या मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या नृत्य स्पर्धेचे उद्घाटन मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर आणि वडगांवचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

नगरसेवक राजेंद्र कुडे , नारायणराव ढोरे, नंदकुमार चव्हाण, विठ्ठलराव घारे, सोमनाथ काळे, विकी लोखंडे, नामदेव वारींगे, रणजीत घारे, सुरेश गुरव, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना भास्करराव म्हाळसकर यांनी गेली 22 वर्षे सुरू असलेल्या या नृत्य स्पर्धेचे कौतुक करत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच 22 वर्षांपूर्वी देखील याच स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगाच्या आठवणींना उजाळा दिला.

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत नगरपंचायत यांच्या वतीने सदैव सहकार्य राहील अशी भावना व्यक्त केली. सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका प्रेमा कुलकर्णी आणि स्नेहा कुलकर्णी या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण करणार असून संस्थेचे हे 22 वे वर्ष आहे.

स्मित कला रंजन संस्थेचे संस्थापक शिवानंद कांबळे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन गिरीश गुजराणी यांनी आणि आभार प्रदर्शन अध्यक्ष अतुल राऊत यांनी केले. उपाध्यक्ष हर्षल ढोरे, खजिनदार नंदकिशोर गाडे, भूषण मुथा, संदेश भांबळ, सुमेध म्हाळसकर, अवधूत गायकवाड, मंदार घारे, केदार बवरे आदींनी नियोजन केले.

वेगवेगळ्या गटात सुमारे 1000 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून पुढील 4 दिवस ही स्पर्धा संपन्न होईल. पारितोषिक वितरण समारंभ 4 फेब्रुवारी रोजी होईल, अशी माहिती अध्यक्ष अतुल राऊत यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.