Vadgaon Maval : स्मित कला रंजन आयोजित ‘डान्स मावळ डान्स’ स्पर्धा शुक्रवारपासून

एमपीसी न्यूज- स्मित कला रंजन आयोजित ‘डान्स मावळ डान्स’ या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. यामध्ये समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्ये सादर केली जाणार आहेत. अशी माहिती संस्थापक शिवानंद कांबळे व अध्यक्ष अतुल राऊत यांनी दिली. स्पर्धेचे हे 22 वे वर्ष आहे.

सर्व वयोगटासाठी समूह नृत्य स्पर्धा शुक्रवारी (दि. 31) दुपारी 12 वाजता होणार आहेत तर वैयक्तिक नृत्य स्पर्धा शनिवारी (दि 1) व रविवारी (दि. २) घेतल्या जाणार आहेत. शनिवारी (दि 1) सकाळी 11 वाजता बालवाडी गटाच्या स्पर्धा होतील तर दुपारी 12 वाजता पहिली ते चौथी गटाच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी गटाच्या जोडी नृत्य स्पर्धा दुपारी 3 वाजता होतील.

रविवारी (दि 2) सकाळी 11 वाजता पाचवी ते सातवी, दुपारी 2 वा आठवी ते दहावी तर दुपारी 4 वा खुल्या गटातील स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी (दि 4) संध्याकाळी 5 वाजता राजमाचीकर पटांगण, चावडी चौक, वडगाव मावळ येथे होणार आहे. श्री समर्थ व्हरायटीज, चावडी चौक, वडगाव मावळ येथे नावनोंदणी केली जाणार असून अंतिम तारीख 29 जानेवारी आहे. स्पर्धकांनी पेनड्राईव्ह व आॅडीओ सिडी दि 29 जानेवारी रोजी जमा कराव्यात. या स्पर्धेत जास्तीतजास्त कलाकारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शिवानंद कांबळे व अध्यक्ष अतुल राऊत यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.