Kamshet : दुकान खाली करण्यास सांगितल्यावरून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज – भाड्याने दिलेले दुकान खाली करण्यास सांगितल्याच्या रागातून तिघांनी व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये व्यापारी गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 20) कामशेत पवनानगर रोडवर चिखलसे गावात घडली.

गुलाबचंद फुलचंद गदिया (वय 57, रा .शिवाजी चौक, कामशेत) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. दत्ता एकनाथ वावरे, निलेश वावरे, (दोघे रा. नायगाव, मावळ) व एक अज्ञात इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाबचंद यांछटा कामशेत येथील जागेत आरोपींनी दुकान टाकले आहे. या दुकानाचे भाडे गुलाबचंद यांनी आरोपींकडे मागितले. तसेच दुकान खाली करण्यास सांगितले. या कारणावरून आरोपींनी गुलाबचंद यांचे वाहन चिखलसे गावच्या हद्दीत कामशेत पवनानगर रोडवर अडवली.

लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याने गुलाबचंद यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण केली. यामध्ये गुलाबचंद यांच्या हाताला आणि पायाला गंभीर इजा झाली. तसेच आरोपींनी गुलाबचंद यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.